Andhra Pradesh Explosion: आंध्र प्रदेशातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

8 जणांचा जागीच मृत्यू!

नवी दिल्ली  : आंध्र प्रदेशातील अनकापल्ले  जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट  झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, लोकांना तो अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या 8 कामगारांचा मृत्यू झाला. अनकापल्लेचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी या संदर्भात माहिती देताना घटनेला दुजोरा दिला. अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी तिथे 30 हून अधिक कामगार उपस्थित होते. या प्रकरणात अधिक माहितीची अद्याप प्रतीक्षा आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013544
error: Content is protected !!