एक एकरातील काढणीला आलेल्या गव्हाला आग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

▪️ अडगाव खाडे शेत शिवारातील घटना

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी – जुन्या वादातून एका शेतकऱ्याच्या शेतातील गव्हाला दि.१७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आग लागून शेतातील गहू जळून खाक झाला, अशी माहिती शेतकरी यांनी दिली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अडगाव खाडे येथे एका व्यक्तीने शेतातील काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला आग लावून नुकसान केले, असे शेतकरी राजेंद्र वासुदेव काळमेघ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तालुक्यातील अडगांव खाडे शेतशिवारात शेख इस्माईल शेख रहीम रा.अंजनगाव सुर्जी यांचे मालकीचे १८ एकर शेत गेल्या २० वर्षापासून शेत सर्वे क्र १५३,१४३ राजेंद्र वासुदेव काळमेघ रा.चौसाळा हे बटाईने करीत होते.राजेंद्र काळमेघ विरुद्ध निलेश डीगांबर काळमेघ वय ३० रा.चौसाळा यांचा जुन्या वादाचा खटला अंजनगाव सुर्जी कोर्टात दि.१७ एप्रिल २०२५ रोजी असता शेतकरी राजेंद्र काळमेघ यांनी सन २०१७ मध्ये झोपडीला आग लावल्याचे प्रकरण आपसी न घेतल्याने निलेश याने काढणीला आलेला एक एकर गव्हाच्या पिकाला आग लावल्याचा संशय फिर्यादी राजेंद्र काळमेघ यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर १७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अडगाव खाडे शेत शिवारातील बटाईने केलेल्या या शेतात १८ पोते अंदाजे ४५ हजार रुपये किंमतीचा काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाल्याचे शेतकरी राजेंद्र काळमेघ यांनी म्हटले असून घडलेल्या संपूर्ण प्रकारची तक्रार अंजनगाव सुर्जी पोलिसात दाखल केली. आरोपी विरुद्ध भान्यासं बीएनएस २०२३ कलम ३२६ (f) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013541
error: Content is protected !!