नागठाणा धरणाचे पाणी चुडामणी नदीत सोडा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शेतकऱ्यांची मागणी, संत्रा बागाचे ओलीत धरणीवर

 

राजुरा बाजार : यंदा नागठाना धरणाचे पाणी न सोडल्याने शेकडो संत्रा बागा ऑक्सिजनवर असून, अखेरच्या घटका मोजत आहे. नदीकाठावरील शेतकऱ्यांनी चुडामणी नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

शेंदूरजनाघाट (रवाळा) स्थित चुडामणी नदीवरील नागठाणा भले मोठे धरण बांधण्यात आले. या धरणावर वरील गावाकरिता आरक्षित पाणी असूनही सोडत का नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी वरूड, अमडापूर, राजुरा बाजार, वाडेगाव, काटी, टेमनी, काचूर्णा, वाघाळ, गाडेगाव, नांदगाव येथील जनावरांना पिण्याचे पाणी, संत्राबागांचे ओलित गंभीर अवस्थेत आहे. नागठाणा धरणातील पाणी चुडामणी नदी प्रवाहित झाल्यास शेकडो शेतकऱ्यांची सिंचन, हजारो गुरे-जनावरांना पिण्याचा प्रश्न निकाली निघू शकते;

 

मात्र बऱ्याच दिवसानंतरही जलसंपदा विभागाचे अधिकारी मूग गिळून बसले असल्याचा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा आरोप आहे. अधिकारीया महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने समस्या बिकट बनली आहे.

 

पाटबंधारे विभागाने आता शेतकऱ्याचा अंत पाहू नये. मरणाच्या दारात उभा असताना अनेक कारणे देऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण सुरू आहे. त्याऐवजी आता तातडीने चुडामणी नदीत पाणी सोडावे.

– विष्णू भोसे, संत्रा उत्पादक, वाडेगाव 

 

धरणाशेजारी मुख्य विमोचक ते वितरण कुंडलगत विहिरीजवळ ५० मीटर उंच संरक्षक भिंत उभारल्याने वितरण करता येणार नाही.

सोहन मडघे, उपविभागीय अभियंता,

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013541
error: Content is protected !!