अमरावती शहर देशात ‘हॉटच्या टॉफ फाइव्ह’ मध्ये
अमरावती पाच दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे. ती पुढील तीन दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत (दि. २६) कायम राहणार आहे. या दरम्यान तापमान ४५ अंशांवर जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार राज्यस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व मध्य प्रदेशात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. राजस्थानकडून उष्ण वारे जिल्ह्यात वाहत असल्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. या दरम्यान वातावरण कोरडे राहून तापमान ४५ अंशांवर जाणार आहे. जिल्ह्यात रविवारी ४४.४ व सोमवारी ४४.६ व मंगळवारीपुन्हा ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शहरात झाली. एप्रिल महिन्यातील हे उच्चांकी तापमान राहिले आहे. देशातील हॉट टॉप चार शहरात अमरावतीचा समावेश या दरम्यान झाल्याने चिंता वाढली आहे..
२६ एप्रिलनंतर अंशतः ढगाळ भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २६ एप्रिलपर्यंत तापमानाची अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर २६ तारखेनंतरला अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात दोन अंशापर्यंत कमी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, चार दिवसांपासून पारा ४४ अंशांपार गेल्याने जिल्हा होरपळला आहे.
असे वाढले तापमान (अंश/सेंटीग्रेड)
१५ एप्रिल …….४२.२
१६ एप्रिल……४२.६
१७ एप्रिल……४३.६
१९ एप्रिल…….४३.८
२० एप्रिल…..४४.४
२१ एप्रिल……४४.६
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





