अमरावती : शहरातील शाळांचा समावेश असलेल्या अमरावती तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला आहे. त्यातील ३६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ११ हजार ९३ विद्यार्थी प्रविष्ट होते. पैकी ११ हजार १८ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पैकी ९९७७ जण उत्तीर्ण झाले. ९३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, २६५१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४८५९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १५३३ विद्यार्थी पास श्रेणीत आले. महिला कनिष्ठ महाविद्यालय (जोग चौक), नूतन कन्या (श्याम चौक),कस्तुरबा (शिराळा), आर्ट्स अँड कॉमर्स (यशोदानगर), विकास विद्यालय (पार्टी), सरस्वती गोसावी (नांदगावपेठ) च्या तिन्ही शाखा, तखतमल, श्री बुलिदान राठी (साईनगर), जमिया फातिमा उर्दू कॉलेज, अल हरम इंटरनॅशनल स्कूल, मदर्स पेट (अंबापेठ), पंजाबराव यावलीकर स्मृती इंग्लिश स्कूल, ए. डी. कॉन्व्हेंट (वलगाव), एसडीएफ (अमरावती) विद्याभारती (अमरावती), इग्निटेड माईइस स्कूल, शहीद स्मारक ज्युनिअर कॉलेज (यावली), बाबासाहेब वहऱ्हाडे कन्या (वलगाव) या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या ९९७७विद्यार्थ्यांमध्ये ४७४० मुले, तर ५२३७मुली आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





