अचलपूर तालुक्याचा निकाल ८७.८३ टक्के

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परतवाडा : गुरुकुल पब्लिक स्कूल, राष्ट्रीय म्युनिसिपल ज्युनियर कॉलेज, एसएसपी पिंपळेकर, दत्तप्रभू आश्रमशाळा, सीतारामजी गणोरकर (पथ्रोट), ब्लू बेल्स कॉन्व्हेंट, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंग्लिश आयडियल स्कूल, नगर परिषद उर्दू, पंचशील फेलिक्स कॉन्व्हेंट, रूट्स पब्लिक, गव्हन्मेंट आयटीआय, एस.डी. सोनुकले शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. तालुक्यातून ३१२५ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३०९९ विद्यार्थ्यांनी विविध शाखांमधून परीक्षा दिली. त्यापैकी २७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जगदंबा महाविद्यालय ९६.२० टक्के, बीएसपी कॉलेज ७३.१३ टक्के, उषाबाई देशमुख (अचलपूर) ९४.८२ टक्के,रहमानिया (अचलपूर) ६८.७८ टक्के, अमरसिंह ज्युनिअर कॉलेज (पथ्रोट) ८८.३० टक्के, जनता ज्युनियर कॉलेज (शिंदी) ८६.४८ टक्के, ज्युनियर आर्ट्स (काकडा) ९६.२२ टक्के, सिद्धार्थ ९५.२० टक्के, गर्ल्स ज्युनिअर (परतवाडा) ९७.४३ टक्के, आयएएस गर्ल्स सेकंडरी ९०,९० टक्के, राजा शिवाजी ५८.५३ टक्के, जानकीबाई देशमुख ९७.५ टक्के, आदर्श ज्युनियर (कांडली) ९०.४७ टक्के, मातोश्री लुल्ला (गौरखेडा कुंभी) ९५.६९ टक्के, बापूराव तुरखडे पाटील (असदपूर) ९५.३१ टक्के, रामकृष्ण (कांडली) ९८.९२ टक्के, सफा मारता उच्च महाविद्यालय (मुगलईपुरा) ९४.५९ टक्के, माध्यमिक आदिवासी ८१.१ टक्के, अ. हमीद उर्दू ८२.१४ टक्के, शहीद टिपू सुलतान ८२.३५ टक्के, व्यंकटेश ज्युनिअर ३५.८९ टक्के निकाल लागला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013540
error: Content is protected !!