Parbhani : बांदरवाडा येथे अवैध वाळू वाहतूक पकडली; महसूल विभागाची कारवाई !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परभणी:- पाथरी तालुक्यातील बांदरवाडा येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाने  सोमवारी कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना यासंदर्भात सोमवार ५ मे रोजी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने तात्काळ कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक उपलब्ध नाही) जप्त केला.

सदर ट्रॅक्टरमध्ये अंदाजे १ ब्रास वाळू आढळून आली असून, ट्रॅक्टर सध्या पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय, पाथरी येथे अडकावून ठेवण्यात आला आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी साजिद सय्यद, विजय भादर्गे व सचिन साबळे यांचा समावेश होता. स्थानिक प्रशासनाने अशा अवैध वाहतुकीवर कडक कारवाईचे संकेत दिले असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013540
error: Content is protected !!