Washim : सरनाईक मॉडर्न डेअरी फार्म व दूध प्रक्रिया केंद्राचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाट्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रिसोड :- तालुक्यातील चिंचांबा पेन येथील सरनाईक शेतकरी उपादक कंपनी कडून इस्राईली तंत्रज्ञाने उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या मॉडर्न डेअरी फार्म आणि दूध प्रक्रिया केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या युनिटच्या माध्यमातून रिसोड आणि मालेगाव तालुक्यात दुग्ध व्यवसाय वाढून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सोहळ्याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर,या प्रकल्पासाठी विशेष मोलाचे सहकार्य राष्टसेवक अविनाश मारशेटवार, सरनाईक शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष जगदीशराव सरनाईक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील पाच वर्षात दर्जेदार उत्पादनं तयार करून या डेअरीने ग्राहकांची मनं जिंकली

सरनाईक डेयरीची २०२० मध्ये केशवनगर येथून सुरवात झाली होती. मागील पाच वर्षात दर्जेदार उत्पादनं तयार करून या डेअरीने ग्राहकांची मनं जिंकली आहेत. आता या अत्याधुनिक मिल्क प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून दूध, दही, तूप, पनीर, पेढा इत्यादी पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जाणारं आहे. आता अधिकचे दुध खरेदीची सोय झाल्यामुळे या परिसरातील दुग्ध व्यवसाय वाढून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. या युनिटच्या उभारणी साठी कंपनीचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी निधी उभा केला आहे. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्ह्याची आकांक्षित असलेली ओळख पुसून प्रेरणादायी जिल्हा बनवायचं असल्याचं सांगितले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी दुग्ध व्यवसाय लाभदाई ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.आभार प्रदर्शन सुदर्शन सरनाईक संचालक सरनाईक फार्मर प्रोडूसर कंपनी लि.यानी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013540
error: Content is protected !!