हत्या करणार्‍या आरोपीस आजीवन कारवास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हिंगणघाट :- हत्या करणार्‍या आरोपीस भादवी कलम ३०२ अंतर्गत आजीवन कारवास आणि  ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय दंड न भरल्यास सहा महिने साधा कारवास तसेच कलम ४४९ अंतर्गत आठ वर्ष सश्रम कारवास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश  विद्याधर काकतकर यांनी सुनावली आहे.

गळ्यावर पोटावर व शरीरावर वार करून केली हत्या

या संबंधात प्राप्त माहितीनुसार शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव वाल्मीक चंदनखेडे आहे. वाल्मीक चंदनखेडे हा येथील संत तुकडोजी वार्ड येथे राहते. त्यांनी १५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास संत तुकडोजी वार्ड येथे राहणारे शिक्षक प्रमोद कृष्णाजी ढगे यांची पत्नी  रीता प्रमोद ढगे ही घरी एकटीच असताना घरात प्रवेश करून निर्दयतेने चाकूने तिच्या गळ्यावर पोटावर व शरीरावर वार करून तिची हत्या केली. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सदर प्रकरणाची केस दाखल झाल्यावर सरकारतर्फे सरकारी वकील दीपक वैद्य यांनी बाजू मांडली. त्यांनी शासनातर्फे एकूण २२ साक्षीदार यांचा युक्तिवाद तपासून बघितला. तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी तपास पूर्ण करून पुरावे गोळा केले होते. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार रंजना झिलपे यांनी काम पाहिले. या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने आरोपी वाल्मीक चंदनखेडे याला भादवी कलम ३०२ अंतर्गत आजीवन कारवास आणि पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची साधी कारवासाची शिक्षा ठोठावली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013538
error: Content is protected !!