वर्धा :- लग्नसमारंभाकरिता परिवारासोबत जात असलेल्या महिलेच्या मोठ्या पर्समधून पावणे पाच लाखाचा ऐवज असलेली लहान पर्स अज्ञात चोरट्याने चोरली. ही घटना उमरेड तालुक्यातील हिवरा या गावी लक्षात आली. महिलेने वर्धा शहर गाठून मंगळवार ६ मे रोजी दुपारी चोरीची तक्रार नोंदविली.
पर्समधून पावणे पाच लाखाचा ऐवज असलेली लहान पर्स अज्ञात चोरट्याने चोरली
सिंदी मेघे परिसरातील रहिवासी असलेल्या महानंदा सुरेश ढोके (६०) ही महिला परिवारासोबत उमरेड तालुक्यातील हिवरा या गावी नातलगाचे लग्न असल्यामुळे ५ मे रोजी दुपारी अंदाजे २ वाजताचे सुमारास वर्धा बसस्थानकात आल्या. वर्धा समुद्रपूर या गाड़ीने हिवरा ता. उमरेड जि. नागपुर येथे जाण्यास निघाल्या. जाम येथून टॅक्सीने हिवरा येथे पोहचल्या. सांयकाळी ६ वाजताचे सुमारास गाँगल ठेवण्यासाठी पर्स चेक केली असता मोठ्या पर्समध्ये ठेवून असलेली लहान पर्स दिसून आली नाही. त्या पर्स मध्ये पस्तीस ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसुत्र, एक १५ ग्रॅम सोन्याची चपला कंठी (पोहे हार) असा एकुन पावणे पाच लाख रुपये किमतीचा एवज आढळला नाही. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने मंगळवार सहा मे रोजी थेट वर्धा शहर गाठून शहर पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदविली. त्या तक्रारीत ५ मे रोजी दुपारी २ वाजताचे वर्धा बस स्थानकातील फलाट क्रमांक पंधरा वर बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवुन मोठ्या पर्समध्ये ठेवुन असलेली छोटी पर्स व त्यामध्ये ठेवुन असलेले सोन्याचे दागीने चोरुन नेले आहे.
वर्धा बसस्थानकावर गाडीत चढत असताना एका अनोळखी महिलेने धक्का दिला होता. त्या महिलेनेच माझे दागिने चोरले असावे असा अंदाज महिलेने शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.वर्धा बसस्थानकात होणार्या सर्व चोर्या, चोरी करणार्या महिलाच करीत असल्याचे आज पर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. वर्धा शहराच्या एका विशिष्ट भागात राहणार्या महिला या चोर्या करतात याचे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध आहेत. त्या महिलांना पोलिसांनी पकडल्यानंतर जामीनावर सुटताच त्या पुन्हा चोरीचा सपाटा सुरू करतात असे चौकशी दरम्यान सांगण्यात येत होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





