पातूर :- पातूर नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी) लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि पातूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पडताळणी प्रक्रिया पार पडत आहे. भारतीय जनता पार्टी मंडळ पातूर शहरच्या वतीने नागरिकांना या योजनेची माहिती देण्यात आली, ज्यामुळे अनेक गरजूंनी घरकुलासाठी अर्ज केले आहेत.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी देखील लाभार्थ्यांना सहकार्य केले, ज्यामुळे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली
ज्या नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ७, ८ आणि ९ मे २०२५ या तारखेदरम्यान पातूर नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक वेळेत कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी देखील लाभार्थ्यांना सहकार्य केले, ज्यामुळे ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. कागदपत्र पडताळणीसाठी आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या पडताळणी प्रक्रियेमुळे पात्र लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या हक्काचे घर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





