नांदगाव खंडेश्वर : शेतकरी व मजूर व विविध योजनांतील लाभार्थीच्या विविध मागण्यांसाठी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलवर धडक आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने प्रोत्साहनपर अनुदान द्या. योग्यरीत्या पीक विमा रक्कम द्या. उत्पादन खर्चानुसार शेतमालाला योग्य भाव द्या. २०२४-२५ हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई तातडीने द्या. सोयाबीन, तूर, चना, कापूस पिकांना योग्य भाव नसल्याने भावांतर योजनेंतर्गत तातडीने अनुदान द्या. शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा नियमित वीज द्या. एमआरजीएस कामाची तातडीने मजुरांना मजुरी द्या. घरकुल सिंचन योजनेतील लाभार्थीना अनुदान रक्कम त्वरित द्या. स्मार्ट मीटर बसवणे बंद करा यांसह इतर मागण्यांचा समावेश होता.
यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप, तालुका काँग्रेस अध्यक्ष निशिकांत जाधव, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, काँग्रेस शहराध्यक्ष अमोल धवसे, दीपक भगत, सुनील शिरभाते, विनोद चौधरी, दीपक सवाई, फिरोज खान, राजेंद्र सरोदे, अतुल ठाकूर, प्रवीण लळे, विनोद जगताप, गजानन भडके, सुधाकर डोंगरे, देवेंद्र सव्वालाखे, संजय कुंभलकर, मोरेश्वर दिवटे, प्रफुल्ल कापडे, सुशील थोरात, मनोहर बगळे, ज्योतीपाल चवरे, गजानन मारोटकर, उमेश सोनोणे, शिवाजी चव्हाण, बाळू सुने, प्रशांत ठाकरे, हारुण, म. इद्रीस, मंगेश जोगे, अमोल पवार, रमेश ठाकरे, राजेश पारधी, राजेश जाधव, अशोक दैत आदींसह काँग्रेसची बरीच मंडळी उपस्थित होती. यावेळी तहसीलदार यांच्या कार्यालयात नागरिकांच्या विविध प्रश्नांवर विविध विभागाच्या मंडळींसोबत चर्चा करून समस्या मांडण्यात आल्या. या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन कॉग्रेसच्या शिष्टमंडळला तहसीलदारांनी दिले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





