धामणगावमध्ये सहा महिन्यांपासून प्रशासक : आरक्षणाचे औत्सुक्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

https://www.youtube.com/@znews-maharashtr

 

 

 

 

पंचायत समितीच्या इच्छुकांमध्ये नवचैतन्य : स्वतंत्र लढणार की युती, आघाडी?

 

 

 

 

 

न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने धामणगाव पंचायत समितीसाठी इच्छुकांची प्रतीक्षा संपणार आहे. नव्या गट आणि गणांची रचना कशी असणार, याबाबतदेखील उत्सुकता वाढली आहे.

धामणगाव पंचायत समितीमध्ये वरूड बगाजी, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली, देवगाव, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, जुना धामणगाव, अंजनसिंगी हे पंचायत समिती सर्कल आहेत. येथे काँग्रेसची सत्ता होती. सहा काँग्रेस व दोन भाजपचे सदस्य यापूर्वी येथे होते. या पंचायत समितीचा कार्यकाळ १३ डिसेंबर २०२४ रोजी संपला. मागील सहा महिन्यांपासून येथे प्रशासकराज आहे. आता निवडणुका चार महिन्यांत घेण्याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिल्यामुळे आठही गणांत इच्छुकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

 

एकला चलो रे’चा नारा!

विधानसभा निवडणुकीवेळी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती-आघाडी झाली नाही तर स्वतंत्र लढण्याची तयारी दाखविली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यामुळे आता शब्द पाळणार की ‘एकला चलो रे’चा नारा दिला जाणार आहे, याकडे लक्ष लागणार आहे.

पंचायत समिती आरक्षण सोडतीवर अनेकांचे भवितव्य वरूड बगाजी, मंगरूळ दस्तगीर, चिंचोली, देवगाव, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द, जुना धामणगाव, अंजनसिंगी या पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होणार आहेत. आठ पंचायत समिती सर्कलमध्ये आगामी काळात घोषित होणाऱ्या आरक्षणानंतर महायुती व महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या वाढणार असली, तरी महायुतीकडे अधिक मागणी होणार आहे. उमेदवारीसाठी आतापासूनच इच्छुक तयारी करीत आहेत. मात्र, आरक्षण सोडतीवरच अनेकांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

 

जिल्हा परिषदेच्या चार सर्कलमध्ये संघर्ष यापूर्वी जुना धामणगावमध्ये अनुसूचित जमाती, मंगरूळ दस्तगीरमध्ये अनुसूचित जाती, देवगावमध्ये इतर मागास प्रवर्ग, तळेगाव दशासरमध्ये सर्वसाधारण असे आरक्षण निघाले होते.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013538
error: Content is protected !!