दर्यापूर न्यायालयात लोकअदालत १५६ प्रकरणे निघाली निकाली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दर्यापूर : तालुका विधी सेवा समिती अंतर्गत १० मे रोजी लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सदर लोकअदालतमध्ये एकूण न्यायालयामधील ३८१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ११७प्रकरणे निकाली निघाली.

दोन्ही मिळून एकूण १५६ प्रकरणे निकाली निघाली. त्यामध्ये ३७ कोटी ७३ लाख ४ हजार ४४ रुपयांची विक्रमी वसुली झाली. लोकअदालतमध्ये एकूण तीन पॅनल होते. पॅनल क्रमांक १ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष ओ. एस. पाटील यांचे होते. पॅनल क्रमांक २ सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. एस. देशमुख व पॅनल क्रमांक ३ दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. आर. यादव यांचे होते. संपूर्ण कामकाज दिवाणी न्यायाधीश ओ.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. दर्यापूर वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सर्व बँक, पतसंस्थांचे कर्मचारी, पक्षकार बांधव यांचे लोकअदालतला सहकार्य लाभले.

 

दाखलपूर्व ३२५ प्रकरणे ठेवण्यात आली होती; त्यापैकी ३९ प्रकरणे निघाली निकाली 

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013538
error: Content is protected !!