लग्नाच्या दिवशीच नियोजित वधूच्या प्रियकराकडून क्रूर खून
लेहगाव/मोर्शी : मध्य प्रदेशातील २४
वर्षीय तरुणाचा मृतदेह कवठाळ शिवारातील विहिरीत लग्नादिवशीच आढळून आला. नियोजित वधूच्या प्रियकराने त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. शिरखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, शुक्रवारी सकाळी घटनाक्रम उघड झाला.
पोलिस सूत्रांनुसार, धरमू मयतीलाल उईके (२४, रा. पाटनाका, ता. आठनेर, जि. बैतूल), असे मृताचे तर दयाराम गंजीलाल वरठी (३४, रा. वलनी, ता. मुलताई, जि. बैतूल), असे आरोपीचे नाव आहे. धरमूचे २३ मे रोजी लग्न होते. त्यापूर्वी दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास कवठाळ शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. मृत धरमूच्या डोक्यावर व गालावर जखमा आढळून आल्या. त्याच परिसरात रक्ताने माखलेला दगड आढळून आला. सबब, हत्येच्या संशयावरून घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. दयारामसोबत गेलेला धरमू रात्री उशिरापर्यंत परतला नसल्याने २१ मे रोजी वडील मयतीलाल उईके यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्याचा तपास करत असतानाच खूनाची उकल झाली.
आरोपीकडून खुनाची कबुलीमो र्शी आणि शिरखेड पोलिसांनी दयारामला दहा तासांच्या आत अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली. त्याला शिरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास ठाणेदार सचिन लुले, सहायक ठाणेदार लक्ष्मण तजे, जमादार संतोष लहाने, रोशन तथे, पंकज चौधरी, वैभव घोगरे करीत आहेत.
रक्त आढळले, विहिरीत मृतदेह ठाकरे यांच्या शेतातील सोकाऱ्याने काठावर रक्ताचे डाग असल्याने आत डोकावून पाहिले असता, त्यात मृतदेह आढळला. ही माहिती पोलिस पाटलांमार्फत मोर्शी पोलिसांना देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख, शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले यांच्यासह ताफ्याने पोलिसांनी मयतीलाल उईके यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. मृतदेहाची ओळख धरमू अशी पटविण्यात आली. शिरखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





