भातकुली येथे सख्ख्या भावाचा केला ‘हाफमर्डर’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : जागेच्या वादातून सख्ख्या भावाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. २१ मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातकुली येथे ती प्राणघातक हल्ल्याची घटना घडली.

संतोष उत्तमराव डाखेरे (४१, भातकुली, ता. धामणगाव रेल्वे) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गोपाल उत्तमराव डाखेरे (४५, रा. भातकुली) विरुद्ध २२ मे रोजी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला.

संतोष व गोपाल हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये घराच्या जागेवरून जुना वाद आहे. आरोपीने फिर्यादीच्या पत्नीस जागेच्या वादावरून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ‘मी घरी नसताना तू माझ्या पत्नीला शिवीगाळ कशाला करतो’, असा जाब संतोष यांनी विचारला. त्यावर आरोपीने संतोष यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर अवस्थेत संतोष यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधारे २२ मे रोजी गोपालविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013536
error: Content is protected !!