दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत परभणीच्या कराटे पट्टू विद्यार्थ्यांचे यश!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

परभणी  : परभणीतील गंगाखेड शहरातील कराटे पट्टू विद्यार्थ्यांनी बालाजी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत  यश संपादन करत गोल्ड, सिल्वर व कांस्य मेडल मिळविले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन!

भारत सरकारचे क्रीडा मंत्रालय  व स्टेअर्स नॅशनल गेम्स  यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19 मे ते 22 मे दरम्यान दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनीं सहभागी झाले होते. यास्पर्धेत सहभागी झालेल्या, गंगाखेड शहरातील विद्यार्थ्यांपैकी कौशिक शाम कुलकर्णी याने 16 वर्ष वयोगटात दोन गोल्ड मेडल तर 14 वर्ष वयोगटात अनुज बालाजी गिरी, गौरव मिसाळ या दोघांनी प्रत्येकी एक गोल्ड मेडल मिळविले. रितेश शिंदे याने सिल्वर मेडल कपिल भालेराव, राधेश शिंदे, श्रेयस मिसाळ, हर्ष भालके यांनी प्रत्येकी एक कांस्य मेडल मिळविले. 12 वर्ष वयोगटात गोविंद ऋषिकेश चौधरी याने गोल्ड मेडल पटकावले. दिल्ली येथील राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा कराटे स्पर्धेत यश संपादन केलेल्या गंगाखेड शहरातील विद्यार्थ्यांनी देशभरात शहराची मान उंचावल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013536
error: Content is protected !!