धावण्याची शिक्षा दिली अन् जमिनीवर कोसळून मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

मृत्यूची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करा, पत्नीची मागणी

 

परतवाडा प्रतिनिधी धुळे येथे पोलिस प्रशिक्षणादरम्यान चुकीची शिक्षा म्हणून दौड लावत असताना सावळापूर येथील माजी सैनिक कोसळला. डोक्याला मार लागल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्याने हेतुपुरस्सर ही शिक्षा दिल्याचा आरोप करीत ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मृताच्या पन्नीने केली आहे. गुरुवारी शासकीय इतमामात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर सावळापूर येथे अंत्यसंस्कार पार पडले.

पंकज लक्ष्मणराव घावट (४३, रा. सावळापूर, ता. अचलपूर, ह. मु. गजानन धाम, अमरावती) असे धुळे येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत दगावलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नागपूर शहर पोलिसात निवड झाली. धुळे येथील नऊ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी संपण्यास १० दिवस शिल्लक होते. २८ मे रोजी चुकीची शिक्षा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यासह २५ रिक्रूटना दौड लावण्याची शिक्षा दिली. प्रकृती ठीक नसल्याचे सांगितल्यावरही शिक्षेत सूट मिळाली नाही. दौड लावत असताना अचानक कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सावळापूर येथे गुरुवारी सकाळी ११:०० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी खा. बळवंत वानखडे, आ. गजानन लवटे, आ. प्रवीण तायडे, माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह माजी सैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी रूपाली (३६), मुलगा रुण्मय (९), मुलगी राजवी (६), भाऊ भूषण, बहिणी आहेत.

 

जबरीने धावायला लावले धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात २८ मे रोजी सकाळी शिक्षा म्हणून प्रशिक्षणार्थीना २६ किलोमीटर धावायला लावले. धावण्यास त्रास होत असल्याचे पंकज घावट यांनी उपस्थित अधिकाऱ्याला सांगितले होते. परंतु, त्यांना जबरीने धावायला लावले, असा आरोप करीत पत्नी रूपाली यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013536
error: Content is protected !!