मेळघाटातील मसोंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत नवीन शिक्षक रुजू; चिमुकल्यांसह शिक्षकांचंही केलं स्वागत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दीड-दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील अनेक शाळा सुरू झाल्या. तर मेळघाटातील मसोंडी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एक मुख्याध्यापक आणि तीन शिक्षक रूजू झाले आहेत.

 

 

अमरावती : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी शाळा पुन्हा सुरू झाल्या. सर्वच शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये छान उत्साह जाणवला. मेळघाटात चिखलदरा तालुक्यात दुर्गम भागात वसलेल्या मसोंडी गावातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांसह शाळेचे मुख्याध्यापक आणि तीन शिक्षकांचाही या शाळेत पहिलाच दिवस होता. विद्यार्थी आणि नवीन शिक्षक यांच्यासाठी सारं काही नवीन असताना शिक्षक, विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद, उत्साह प्रचंड झळकत होता.

रिमझिम पावसात काढली मिरवणूक : चला चला शाळेत चला अशा घोषणा देत मसोंडी गावात सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. बँड पथकाच्या तलवार निघालेल्या मिरवणुकीमुळं अख्ख गाव दुमदुमलं होतं. विशेष म्हणजे सकाळपासून बरसणाऱ्या रिमझीम पावसात विद्यार्थांच्या मिरवणुकीत छान शिस्त दिसत होती.

 

हार फुलांनी सजवली शाळा : शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शाळेतील सर्व वर्ग खोल्यांच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्यात आले होते. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील विविध वृक्षांच्या पानांचं भव्य तोरण बांधण्यात आलं होतं. हिरव्यागार जंगल परिसरात असणारी शाळा छान पानांफुलानी सजवण्यात आली होती.

 

विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट : इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांच्या पावलांचे हळद कुंकूद्वारे ठसे घेण्यात आले. शाळेचा पहिला दिवस स्मरणात राहावं यासाठी शाळेच्या आवारात खास सेल्फी पॉइंट लावण्यात आला होता. याठिकाणी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे वैक्तिक फोटो काढले.

विद्यार्थ्यांचं स्वागत, शालेय साहित्याचा वितरण : शाळेत इयत्ता पहिलीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सलोना केंद्राचे प्रमुख पंडित बनसोड आणि सलोना ग्रामपंचायतच्या उपसरपंचन रेखा मारुती गायन यांच्याहस्ते गुलाग पुष्प आणि पेन देऊन स्वागत करण्यात आलं. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेशासह शालेय साहित्य वितरीत करण्यात आलं.

गरम खिचडीसह शिरा : शाळेच्या पहिल्या दिवशी छान गरम खिचडीसह गोड शिऱ्याचं जेवण विद्यार्थ्यांना देण्यात आलं. शाळेचा पहिला दिवस असला तरी पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह झळकत होता.

शाळेत सर्वच शिक्षक नवीन : मेळघाटातील जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षकांची बदली झाली. मसोंडी येथील शाळेत यावर्षी मुख्याध्यापक म्हणून सचिन करडे हे रुजू झालेत. तर गजानन सोळंके, राजाभाऊ तोटे आणि सज्जुलाल कासदेकर हे शिक्षक देखील पहिल्यांदाच या शाळेत रुजू झालेत. इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत असणाऱ्या या शाळेत एकूण ५८ विद्यार्थी आहेत. एका खोलीत भरणाऱ्या दोन वर्गात एक शिक्षक या शाळेत शिकवता.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013530
error: Content is protected !!