रुग्णालय प्रशासनाकडून दखल, औषधी ठेवण्यासाठी जागा पडतेय अपुरी
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी प्री-फॅब रुग्णालयात अस्ताव्यस्त पडल्याची बातमी प्रकाशित होताच औषध भंडार विभागाने तातडीने ती औषधी उचलून त्या ‘डफरीन’च्या जुन्या इमारतीमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. परंतु गोडावून नसल्याने औषधी ठेवायच्या कुठे, असा प्रश्न औषध भंडार विभागापुढे आहे. प्री-फॅबमध्ये औषधी धूळखात असल्याचे बातमी ‘झी 24 न्युज ‘ने प्रकाशित केली होती. यामध्ये आयबुप्रोफेन सस्पेंशन, डायलिसिससाठी वापरण्यात येणाऱ्या कॉन्सन्ट्रेटेड हीमोडायलिसिस सोलूशन बीपीच्या कॅन आणि इंजेक्शन सिरिंजचा समावेश होता. आता प्री-फॅब रुग्णालयदेखील मेडिकल कॉलेजच्या द्वितीय वर्षासाठी देण्यात आले.
किती वेळा औषधी उचलणार?जिल्हा रुग्णालयातील आयसीयू इमारतीच्या बांधकामासाठी औषधी ठेवण्यासाठी असलेले गोडावून पाडण्यात आले. त्यामुळे ही औषधी प्री-फॅबला लागून असलेल्या गोडावूनमध्ये ठेवण्यात आली होती. या गोडावूनमध्ये मेडिकल कॉलेजची क्लासरूम तसेच ग्रंथालय झाल्याने येथून पुन्हा ती औषधी प्री-फॅबमध्ये हलविण्यात आली.
औषधी ठेवण्यास जागा उपलब्ध नाही. कोणतीच औषध खराब झाली नाही. इंजेक्शन सिरिजही पॅक असल्याने सुरक्षित आहेत. आता सर्व औषधी डफरीनच्या जुन्या इमारतीत ठेवल्यात.
राजेश सिरसाट,औषध भंडार प्रमुख, इर्विन
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





