अमरावती : एका १७ वर्षे सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. मोर्शी तालुक्यातील एका गावात तो प्रकार घडला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी २४ जून रोजी आरोपी राहुल सुधाकर महल्ले (२६, रा. ता. मोर्शी) याच्याविरुद्ध बलात्कार व ‘पोस्को’ अन्वये गुन्हा दाखल केला.
ऑक्टोबर २०२४ च्या सुमारास पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील आरोपीने तिला पळवून नेले. मोर्शी येथील एक वसाहत व एका शेतशिवारात ठेवून आरोपीने तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. वैद्यकीय तपासणीत ती बाब उघड झाली. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तिला जीवाने मारून टाकण्याची धमकीदेखील देण्यात आली. अखेर तिने २४ जून रोजी मोर्शी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. सहायक फौजदार विनोद कुरळकर यांनी तिची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





