अपात्र करणे हे षडयंत्र; स्थगिती हा सत्याचा लढा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बच्चू कडू : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सत्ताधाऱ्यांशी छुपी युती

बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखाच बच्चू अध्यक्ष कडू यांनी पत्रपरिषदेमध्ये मांडला

अमरावती : एका प्रकरणात शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतरही विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेत अपात्रतेचा निर्णय दिला. १३ मे रोजीचे आदेश तब्बल महिनाभर दडवून ठेवले. हा षडयंत्राचा भाग आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत सत्ताधाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला. या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा सत्याचा लढा असल्याचे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, १३ मे रोजी सरकारी वकिलांना विभागीय सहनिबंधकांनी याबाबत मार्गदर्शन मागितले होते व त्याच दिवशी अपात्रतेचा निर्णय दिला. याबाबतचे आदेश महिनाभर दडवून ठेवले. हे आदेश अद्यापही अप्राप्त आहे. दबावतंत्र व सूड घेण्याचा हा प्रकार आहे. भाजपची काही मंडळी बँकेची बदनामी करतात. प्रत्यक्षात बैंक यंदा ९० कोटींनी नफ्यात असल्याचे कडू म्हणाले. कर्मचाऱ्यांची पगारवाढ, संगणकीय सुविधा यामुळे किमान काँग्रेसच्या संचालकांनी बँकेची बदनामी करू नये. मागे हटणाऱ्यांपैकी आपण नसल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे, संचालक नरेशचंद्र ठाकरे यासह अनेक संचालक उपस्थित होते.

त्या’ फोनमुळे विभागीय सहनिबंधकांवर दबाव

मंत्रालयात स्कॅन केल्याशिवाय प्रवेश नाही आणि इथे फोन करून अधिकाऱ्यांवर दबाब आणला जातो.

महिनाभर आदेश दडविले जातात. त्यांचे ऐकणाऱ्यांना आता दणका दिल्याशिवाय राहणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले. जिल्ह्यात सध्या जे कर्जवाटप झाले, त्यामध्ये ८० टक्के वाटा जिल्हा बँकेचा आहे. बच्चू कडू शेतकरी, दिव्यांगांसाठी झटत असल्याने शासनावर दबाव आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून काढण्याचे हे कटकारस्थान असल्याचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे म्हणाले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013530
error: Content is protected !!