बीजांकुर धोक्यात, किडींचा अटॅक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दमदार पावसाअभावी वाढला किडींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची वाढली चिंता

 

अमरावती : पाऊस येईल या अपेक्षेत शेतकऱ्यांनी कोरड्यात पेरणी केली. आता हे बीजांकुर किडींचे भक्ष्य ठरत आहे. पावसाचा खंड असताना हंगामपूर्व लागवड झालेली पिके व आता पेरणी झालेली पिके किडींच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आलेली आहेत. यामध्ये खुरपडी, पैसा व वाणीचा अटॅक होत आहे.

रोपावस्थेतील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही एक निशाचर कीड असून, या किडीची संख्या वाढल्यानंतर जमिनीवर संपर्कात आलेले रोपटे, बियाणे खाऊन उपजीविका करतात, रोपे कुरतडून टाकतात, रोपांची पानेदेखील कुरतडतात. त्यामुळे रोपांची संख्या कमी झाल्याने दुबार पेरणीची वेळ येते. या किडीची एक मादी जमिनीत काही इंच खोलीवर सुमारे ३०० अंडी घालते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013530
error: Content is protected !!