पावसाळ्यापेक्षा भर उन्हाळ्यात पाऊस जास्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जून महिन्यात ५८ टक्के पावसाची तूट; मे महिन्यात १२५.५ मिमी पावसाची नोंद, आता येलो अलर्ट

 

अमरावती : जिल्ह्यात जूनच्या २३ तारखेपर्यंत सरासरी ६७.५ मिमी पाऊस झाला. यामध्ये ५८ टक्के पावसाची तूट असल्याने पेरण्या थबकल्या. त्याच्या तुलनेत भर उन्हाळ्यात म्हणजेच मे महिन्यात अवकाळी पाऊस व त्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस झाला. यामध्ये २५ दिवसांत १२५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती.

मे महिन्यात अवकाळीची रिपरिप व मान्सूनपूर्व पाऊस २८ मेपर्यंत सुरू होता. यादरम्यान १० तालुक्यांमध्ये १२५ ते १३५ मिमी पर्यंत पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे शेती मशागतीचे कामे सुरू होऊन शेतकरी पेरणीच्या तयारीत होता. प्रत्यक्षात पावसाचा खंड राहिल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यावर्षी राज्यात मान्सून मुदतपूर्व दाखल झाल्याची शुभवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली होती. प्रत्यक्षात मान्सून विदर्भापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची गती कमी झाली.

 

ढगाळ वातावरण, ‘येलो अलर्ट’ दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाची उघडीप आहे. भारतीय हवामान विभागाने ३० जूनपर्यंत जिल्ह्यास पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही भागात शेतकरी पेरणी करीत आहे.

जिल्हा स्थिती

मे महिन्यातील पाऊस : १२५.५ मिमी

जून महिन्यातील पाऊस : ६७.५ मिमी

ही करा उपाययोजना पिकांवर किडींचा प्रादुर्भाव असल्यास क्लोरपायरीफॉस २० ईसी ३७.५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून रोपांभोवती वर्तुळाकार वा सरळ ड्रेचिंग करावे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013533
error: Content is protected !!