राजुरा बाजार : तालुक्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशीची जमिनीतील ओलाव्यावर पेरणी केली. हलक्या फुलक्या पावसाने उगवण चांगली झाली. मात्र, चक्क आठ दिवसांपासून तालुक्यातील गावशिवारात पिकांना दमदार पाऊस पडला नाही. परिणामी पेरणी केलेली पिके कोमेजून जात असल्याने पावसाच्या चिंतेने शेतकरी अस्वस्थ आहे.
मृग नक्षत्र गेले, जूनमधील तीन आठवडेही उलटून गेले. अद्यापही वरुड तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १९ जूनदरम्यान परिसरात खरिपाची ७० टक्के पेरणी केली. आठ दिवसांपासून तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. तथापि, अजूनही दमदार पाऊस पडला नाही.
पाऊस न पडलेल्या शिवारातील पिके प्रखर उन्हाने कोमेजू लागली आहेत. दररोज काळेकुट्ट ढगांची गर्दी होते. अंगणात सड्यासारखा पाऊस पडतो.
सकाळी सायंकाळी पिके टवटवीत दिसतात दिसतात, मात्र दुपारच्या कडक उन्हात पिके कोमेजून जातात. मृग नक्षत्र
पावसाने अंदाज चुकविला?
शहरात उंच इमारतींना वारे अडतात. त्यामुळे खेड्याच्या तुलनेत शहरात पाऊस जास्त पडत असल्याचे दिसून येते. यंदा पावसाने हवामान विभागाचे अंदाज आतापर्यंत चुकविले आहेत. परिणामी शिवारात ढगांमध्ये गर्दी होते, परंतु पाऊस येतच नाही. येत्या दोन दिवसात पिकांना तालुक्यात सार्वत्रिक दमदार पाऊस पडल्यास पिकांना जीवदान मिळू शकते, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आता आर्द्रा नक्षत्राची वाट पहावी लागणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





