वरूड : रासायनिक खतांच्या किमतीमध्ये आमूलाग्र वाढ झाल्याने २०० ते ३०० रुपयांनी खते महागली. खते, बियाणे खरेदी करण्याकरिता पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजविण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. पर्याय म्हणून कृषिसेवा केंद्राकडे कृषी माल आताच गहाण ठेवून विक्रीच्या वेळी धान्य व्यापारी दुकानदार जे भाव असेल, त्या भावात घेऊन उधारी चुकती करून घेत असल्याचा अफलातून प्रकार सुरू आहे.
जमिनीचा पोत कायम ठेवून भरघोस
उत्पादन निघावे म्हणून मायक्रोन्यूट्रॉन, पोटॅश, सुपर फॉस्फेट, डीएपी, नत्र, स्फुरद आदी घटकांचा समावेश असलेल्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एकीकडे सेंद्रिय शेतीचा पुरस्कार होत असताना, २०२४ मध्ये खतांच्या ज्या किमती होत्या, त्यामध्ये २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली. त्याच वेळी कपाशी, तूर, ज्वारी, मका आदी बियाण्यांच्या किमतीतसुद्धा वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रसंगी खासगी सावकाराकडून कर्जाऊ रक्कम घेताना शेतजमिनीची इसारचिठ्ठी करून द्यावी लागत आहे.
बियाण्याच्या किमती दुप्पट, शेतमालाचा कवडीमोल भाव शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले पाहिजे. खत व बियाण्याच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कमी करुन आटोक्यात आणाव्या तसेच लिंकिंगचा प्रकार बंद करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यात डीएपी खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. बरेच दुकानदार लिंकिंगमध्ये खत विक्री करीत असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.
खतांची दरवाढ अशी
खताचा प्रकार जुने दर नवे दर
२०:२०:००:१३ १३०० १४५०
१०:२६:२६ १४७० १७५०
१५:१५:१५ १४५० १६५०
डीएपी १३५० १३५०
१४:३५:१४ १७०० १८००
१८:१८:१० १२०० १३००
एसएसपी ५५० ७००
एमओपी १५५० १६००
युरिया २६६ २६६
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





