शेतातील सोलर पॅनल उलथून गेलं; भरपाईसाठी अर्ज कोठे कराल?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवर बसविण्यात आलेल्या सोलरला वादळीवाऱ्याचा फटका बसून नुकसान होत आहे. परंतु, काळजीचे कारण नाही. संबंधित कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने, तर महावितरणकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतो. त्यानंतर सोलर पॅनलची दुरुस्ती करून मिळते.

शेतकऱ्यांची वीज समस्येपासून सुटका व्हावी, यासाठी शासनाच्यावतीने कुसुम योजना राबविण्यात आली. ही योजना आता गुंडाळण्यात आली असून, त्या जागी ‘मागेल त्याला सोलरपंप’ ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना १० टक्के लाभार्थी हिश्श्याची रक्कम भरून सोलर पंपाचा लाभ दिला जात आहे.

 

सोलर पंपसेटच्या संख्येत प्रचंड वाढ वीज समस्येला कंटाळलेले शेतकरी सोलरकडे वळू लागले आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात सोलर पंपसेटच्या संख्येत वाढ झाली आहे.

मदत कोणाकडून मिळते?

सौर कृषिपंप बसविल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनीकडून करण्यात येते. कंपनीकडून मदत मिळते.

सोलरला वादळाचा तडाखा एप्रिल महिन्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसात अनेक ठिकाणी सोलर पॅनल्सना तडाखा बसला.

भरपाईसाठी अर्ज कसा?

सोलर पॅनलचे नुकसान झाल्यास कुसुम किंवा मागेल त्याला सौर कृषिपंप या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. प्रतिसाद न मिळाल्यास महावितरणकडेही अर्ज करता येतो.

पॅनल कोसळले, नुकसानभरपाई मिळेल का?

शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर संबंधित कंपनीकडून पडताळणी होते. त्यानंतर नुकसान भरपाई दिली जाते.

सोलर पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याने संबंधित संकेतस्थळ किंवा महावितरणकडे अर्ज करावा. अर्जाची शहानिशा करून दुरुस्तीसाठीची प्रक्रिया केली जाते.

दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता, महावितरण, अमरावती

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013533
error: Content is protected !!