जालना जिल्ह्यात भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन टीका ओढवून घेतली होती. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरणही दिलय.
जालना – “कुचरवट्यावर बसणाऱ्या कार्ट्यांच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो, तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये बबनराव लोणीकराने दिले, तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे….” अशा प्रकारची वक्तव्ये माजी मंत्री भाजपा नेते बबनराव लोणीकर यांनी लाभार्थ्यांविषयीचं बोलताना केली होती. त्यावरुन त्यांच्यावर विरोधी नेत्यांनी सडकून टीका केली. त्यावर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलय.
नरेंद्र मोदीजींचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अंध:भक्त म्हणणारे ‘कुचरवट्यावर’ बसणारी कार्टी आहेत. असं वक्तव्य जालना जिल्ह्यातील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय. परतूर तालुक्यातील वाटूर येथे हर घर सोलार योजनेचा लोणीकरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. काही तरुण ‘कुचरवट्यावर’ बसतात आणि हे आमदाराच्या दावणीला बांधलेले आहेत असं लिहितात. गावात विकासाची कामं केली, विविध योजनेतून पगार सुरू केले, पेन्शन योजना आणली. मात्र कुचरवट्यावर बसणारी कार्टी लिहितात की हे देवेंद्र फडणवीसांचे, नरेंद्र मोदीजींचे अंध:भक्त आहेत. पण तुझ्या गावात पंचवीस वर्षात जे दिलं ते बबनराव लोणीकरांनीच दिलं. कुचरवट्यावर बरणाऱ्या कार्ट्याच्या आईचा पगार बबनराव लोणीकर करतो, तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये बबनराव लोणीकराने दिले, तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे. असं लोणीकर यांनी म्हटलं आहे.
“चुकलो नसलो तरी माफी मागतो” – बबनराव लोणीकर यांनी अशा प्रकारची वक्तव्यं केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर लोणीकर नरमल्याचं दसले. वादग्रस्त वक्तव्याबद्दल लोणीकरांनी काही चुकलं असलं तर माफी असावी असं म्हटल्याचं आमचे प्रतिनिधी कळवतात. मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही. मी शेतकऱ्यांमुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे, असं लोणीकर म्हणालेत. त्याचवेळी विरोधी राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्या विरोधात मी बोललो, असं लोणीकर यांनी स्पष्ट केलय.
जालन्यातील परतुरचे भाजपा आमदार असलेल्या बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वकव्य केलं. या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागीतलीय. या वक्तव्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही लोणीकर यांनी समाचार घेतला. विरोधक पिंपळाचं पान जमिनीवर पडल्यानंतर पिंपळगाव जळाल्याचा भास निर्माण करत असल्याचा टोला लोणीकर यांनी लावला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





