निर्मला कनिष्ठ महाविद्यालयातील जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनावर मार्गदर्शन सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा- ठाणेदार अनंत वडतकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अंजनगाव सुर्जी सचिन इंगळे प्रतिनिधी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून, रहिमापुर चिंचोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर यांनी स्थानिक निर्मला कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना अमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन केले. व्यसन ही सर्वात मोठी मानवी अपप्रवृत्ती असून, तरुणांनी या अपप्रवृत्तीला बळी पडू नये, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अमली पदार्थाचे शरिरावरील होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देऊन, गुटखा, तंबाखू ते ड्रग्स पर्यंतच्या सर्व अमली पदार्थांच्या मोहापासून दूर राहण्याचा विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला.

 

 

तसेच विविध अमली पदार्थ जवळ बाळगल्यास कुठल्या प्रकारची कायदेशीर शिक्षा होऊ शकते याचीही विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. शरिरा सारखी जीवनात दुसरी संपत्ती नसून तरुणांनी या संपत्तीचे रक्षण करावे, असाही गुरुमंत्र त्यांनी याप्रसंगी दिला. व्यसन करायचेच असेल तर अभ्यासाचे करा की, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचा, समाजाचा व राष्ट्राचा विकास होईल, असे समुपदेशन शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सोबतच लैंगिक शोषण, पोक्सो कायद, महिलांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपायोजना, याबाबत अलीकडे कायद्यात झालेल्या सुधारण्यांची माहिती सुद्धा त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिली. या उद्बोधनपर कार्यक्रमाला निर्मला विद्यालयाचे प्राचार्य रेव्ह. फादर तवामणी उपप्राचार्य श्री गोपाल डालके, फादर सुनील तसेच सहाय्यक पोलीस श्री ठणगण व सहायक पोलीस कु भुस्कट्टे ह्या सुद्धा याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

 

श्रोते म्हणून या कार्यक्रमाला इयत्ता दहावी व बारावीचे कुमार अवस्थेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. एका संवेदनशील व समाजाभिमुख ठाणेदाराने अशा प्रकारे शाळेमध्ये येऊन पोटतिडकीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे ठाणेदार अनंत वडतकर यांच्या बद्दल समाजामध्ये आपुलकीची व आदराची भावना निर्माण झाली आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013530
error: Content is protected !!