धक्कादायक! २७ वर्षीय पीडिता चष्मा विक्रेत्याच्या जाळ्यात अडकली अन… –

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना ठाण्यातील भिवंडीत घडली आहे. आरोपी चष्मा दुकानदार आहे.

 

 

ठाणे – चष्मा विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे एक २७ वर्षीय पीडित तरुणी आपला चष्मा दुरुस्तीसाठी गेली असता त्या दुकानदारानं सुरवातीला तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर एका कॅफे हाऊसमध्ये बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नराधम दुकानदाराच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजान पिंजारी असं गुन्हा दाखल झालेल्या दगाबाज दुकान मालकाचं नाव असून तो फरार असल्याची माहिती तपास अधिकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पाटील यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित तरुणी भिवंडी शहरात एका संकुलात कुटुंबासह राहते. एप्रिल महिन्यात पीडिता चष्मा बनवण्यासाठी नराधम फैजान याच्या निजामपूरा हद्दीत असलेल्या दुकानात गेली होती. त्यावेळी दगाबाज फैजान पीडितेशी गोड बोलून तिच्याशी ओळख केली. त्यानंतर दोघात मैत्री होताच दगाबाज फैजानने नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या सोबत प्रेमसंबंध निर्माण करुन त्याचाच फायदा घेत फैजानने पीडितेला भावनिक जाळ्यात अडकवले. स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेण्याची भीती घालून पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर भिवंडी शहरातील एका कॅफे हाऊसमध्ये २४ एप्रिल ते १९ जून दरम्यान अत्याचार केले.

 

याप्रकरणी २७ जून रोजी पीडितेच्या फिर्यादीवरून दगाबाज फैजानच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. लवकरच त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि एस. आर. पाटील करीत आहेत. मात्र या गुन्ह्यात एका सर्वजिक ठिकाणी असलेल्या कॅफे हाऊसचा वापर केल्यानं लॉजनंतर कॅफे हाऊस मध्येही अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013528
error: Content is protected !!