अंजनगाव सुर्जी येथे ‘एमपीटी’ केंद्र सील; नियमबाह्य गर्भपात केंद्र जोरात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

नियमबाह्य गर्भपात केंद्र सुरू असताना प्रशासनाची कारवाई मात्र नगण्य असल्याचे चित्र आहे.

 

जिल्हा नियंत्रण पथकाची कारवाई, केंद्र संचालकांना बजावली नोटीस

 

अमरावती : नियमबाह्य गर्भपात केंद्र चालविणे, अनियमितता राखणे, रेकॉर्डमध्ये सुसूत्रता न ठेवल्याप्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील गर्भपात केंद्र सील करण्यात आल्याची कारवाई गुरुवारी जिल्हा नियंत्रण पथकाने केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात नियमबाह्य गर्भपात केंद्र जोरात सुरू असल्याचे स्पष्ट होते. आरोग्य यंत्रणेने संजीवनी हॉस्पिटल ‘एमपीटी’ केंद्राच्या संचालकांना नोटीस बजावली आहे.

जिल्हा पथकाकडून गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायदा, १९९४ अंतर्गत अंजनगाव सुर्जी येथील संजीवनी हॉस्पिटलचे एमटीपी केंद्र तसेच बॉम्बे नर्सिंग होम अंतर्गत तपासणी करण्यात आली. यात पथकाला ‘एमटीपी’चा कुठलाही रेकॉर्ड तिथे आढळून आलेला नाही. एमपीसीपीचे नोंदणी अथवा अग्निशमन प्रमाणपत्र दिसून आले नाही. यासह अनेक त्रुटी आढळून आल्याच्या कारणांनी या गर्भपात केंद्राची अर्थ व नोंदणी नेहमीकरिता रद्द करून ते सील करण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान चमूमध्ये अंजनगाव सुर्जीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नालट, पीसीपीएनडीटीच्या कायदेशीर सल्लागार अॅड. प्रणिता भाकरे, पर्यवेक्षक किशोर भोंडे, कार्यालयीन अधीक्षक संतोष शतुरवार, सहायक अधीक्षक श्रीकृष्णा चव्हाण आदी उपस्थित होते. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

एमटीपी शस्त्रक्रिया म्हणजे काय?

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) याला वैद्यकीय गर्भपात, एमटीपी प्रक्रिया, एमटीपी किट, एमटीपी कायदा, एमटीपीची किंमत आणि एमटीपी जोखीम, असेही म्हणतात.

 

जिल्हा पथकाकडून गर्भपात केंद्रांची निरंतर तपासणी केली जाते. गुरुवारी अंजनगाव सुर्जी येथील संजीवनी हॉस्पिटलच्या ‘एमपीटी’ केंद्राची तपासणी केली असता त्रुटी दिसून आल्या असून, ते केंद्र सील करण्यात आले आहे.

– डॉ. दिलीप सौंदळे, सीएस.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013528
error: Content is protected !!