चक्री, हत्ती, घोडा, तितली सुसाट दरमहिना ३० कोटींची उलाढाल!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : ऑनलाइन लॉटरीच्या आड

संकेतस्थळावरील जुगाराचे अड्डे अलीकडे वाढले आहेत. त्या जुगारातील गेममधील चक्री, हत्ती, घोडे सुसाट सुटले आहेत. त्यातून महिन्याकाठी तब्बल २५ ते ३० कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती उघड झाली आहे. शहरात लॉटरीच्या आड जुगाराचे सुमारे १००च्या आसपास अड्डे सुरू असल्याची माहिती आहे. त्या प्रत्येक सेंटरवरील रोजची उलाढाल ७० हजार ते एक लाखांच्या घरात असल्याचे पोलिसांच्या कालपरवाच्या धाडीत स्पष्ट झाले आहे.

शहरातील काही विशिष्ट संकुलातील दुकानांत मोठ्या पडद्याआड तो ऑनलाइन जुगाराचा गोरखधंदा सुरू आहे. गुन्हे शाखेने २० जून रोजी दुपारी राजकमल चौकातील एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील तीन लॉटरी सेंटरवर धाड घातली होती. तेथून ११ ऑपरेटर व २० जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तेथून ऑनलाइन जुगाराचे १.४६ लाख रुपये रोख व ६.५० लाख रुपये किमतीचे जुगार साहित्य जप्तीसह तीन मालकांना आरोपी करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी रहाटगावात कारवाई करण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013528
error: Content is protected !!