
अमरावती: आज दि.28/6/2025 रोजी शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ व समृद्धी वनधन विकास केंद्र टेंबुसोंडा यांच्या संयुक्त विधमाने ग्राम भिलखेडा येथे आदिवासी गौरव वर्ष निम्मित आदिवासी जनजाती करिता विविध योजनांची माहिती देण्याकरिता धरती आबा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिराला शबरी आदिवासी वित्त व विकास विभाग धारणी शाखा व्यवस्थापक मा.श्री गणेश साखरे, मा.प्रियंका इंगळे सि.एम.आर. सी. व्यवस्थापक , कृषी विभाग चिखलदरा कृषी सहायक मा.श्री. तोटे सर, मा. सचिन धोटे पाणी फाऊंडेशन, पशु व्यवस्थापक डाँ.श्री अमोल मामनकर ,सि. एम. आर.सी. पशू व्यवस्थापक, तसेच सि.एम.आर.सी स्टाफ यांची उपस्थिती होती. सदर शिबिरामध्ये, शबरी कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, आदिवासी विकास प्रकल्प योजना, कृषी विभाग योजना, माविम् योजना, पशुसंवर्धन विभाग योजना,पाणी फाऊंडेशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना. वनधन योजना इत्यादी. योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या शिबिराला महिलांची उपस्थितीत जास्त प्रमाणात पाहायला मिळाले.तसेच महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





