आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांनी रुग्णांशी साधला संवाद!
वरूड/तुषार अकर्ते
जन सामान्यांच्या हितासाठी, त्यांच्या सदृढ आरोग्यासाठी व रोगाचे योग्य निदान करण्यासाठी आशा चॅरिटेबल ट्रस्ट, वरूड शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर व भाजपा शे.घाट च्या वतीने आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि.२७ जुन रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत शें.घाट शहरातील न.प.मराठी शाळा क्रमाक १ मध्ये भव्य निःशुल्क महाआरोग्य शिबीर पार पडले आहे.
या शिबीराची सुरूवात आ.चंदु यावलकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतीमेचे पुजन, हारर्पन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ.यावलकर यांचे जंगी स्वागत केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आ.यावलकर बोलताना म्हणाले की, आरोग्य हिच ईश्वर सेवा अंगीकारून मी हे कार्य आमदार होण्यापूर्वी पासुन करत आलो आहे आणि याचा विस्तार यापुढे वाढत राहिल गरजु नागरिकांना एक रूपया खर्च न करता औषध उपचार घेता यावा, विविध तपासण्या करत्या याव्यात हा या मागचा उद्देश आहे. नागरिकांचे आरोग्य सदैव उत्तम व निरोगी राहण्यासाठी महिन्यातुन तीन शिबीर घेतले जाणार आहे. तुम्ही माझ्यावर जो निवडणुकीत विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कधीही तळा जाऊ देणार नाही माझ्याकडुन कुठलेही चुकीचे काम होणार नाही काही लोकांनी माझ्यावर आरोप केले त्याला रविवार दि.२९ जुन रोजी पत्रकार परिषदेतून मी उत्तर देईल. यानंतर आ.यावलकर यांनी शिबीर स्थळाची पाहणी करत उपस्थित डॉक्टर व नागरिकांशी संवाद साधला. या महाआरोग्य शिबीरात एकुण १,१४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील ११२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असुन २९ जुलै रोजी ७९ व २ जुलै रोजी ३३ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया पार पडणार आहे. या रूग्णांसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध राहणार आहे.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते विविध रोगांच्या तपासण्या करून सर्व रूग्णांना शिबीर स्थळीच मोफत औषधांचे वितरण सुद्धा करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आशा चॅरिटेबल ट्रस्ट वरूड शालिनी मेघे हॉस्पिटल नागपूर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या शिबिरासाठी आशा चॅरिटेबल ट्रस्ट, वरूड व स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





