हिंदी भाषेच्या संदर्भात राज्य सरकारनं दोन जीआर मागे घेतले आहेत. या निर्णयानंतर मनसे नेते राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
दोन जीआर रद्द केल्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. या निर्णयाचं शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. ठाकरे हाच ब्रँड आहे. सरकारनं एकजुटीचा धसका घेतल्याचं म्हणतं राऊतांनी महायुतीला डिवचलं आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या समितीचा अहवाल काहीही येवो, आम्ही सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हटलं आहे.
सरकारकडून हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न का करण्यात येत होता? याबाबत राज ठाकरे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं, ” इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेण्यात आला. सरकारनं २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही. कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेण्यात आली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं? यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.”
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






