पोलिसांनी तातडीनं गावकऱ्यांच्या मदतीनं छतावर अडकलेल्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.
पूर्व सिंहभूम : झारखंडमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर्व सिंहभूम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळं पोटकामधील कोवाली पोलीस ठाणे परिसरातील हरिना येथे असलेल्या गुदरा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीचं पाणी घरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात शिरू लागलं आहे. गेल्या शनिवारी रात्री नदीजवळील लव कुश निवासी शाळेतही पाणी शिरलं होतं. त्यावेळी मुलं शाळेच्या वसतिगृहात झोपली होती. दरम्यान, पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं वसतिगृहात झोपलेल्या 162 मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर मुलांनी वसतिगृहात पाणी आल्यानंतर शाळेच्या छतावर चढण्यास सुरुवात केली आणि आपले प्राण वाचवले.
यादरम्यान, शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. सकाळी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं गावकऱ्यांच्या मदतीनं छतावर अडकलेल्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. दोरी आणि बोटीच्या मदतीनं मुलांना रेस्क्यू करण्यात आलं आणि जवळच्या सरकारी शाळेत सुरक्षितपणे पाठवण्यात आलं. सर्व मुलं पूर्णपणे भिजली होती. दरम्यान, मुलांच्या या मदतकार्यात कोवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी धनंजय कुमार पासवान आणि मुसाबनीचे डीएसपी संदीप भगत यांनी महत्त्वाचं योगदान दिलं.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





