स्वतंत्र भारत मिशनला अकरा महिन्यानंतर नियमित उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहे.बाळासाहेब रायबोले उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे सांभाळली. जिल्हा परिषदेत अद्यापही सामान्य प्रशासन विभाग व मनरेगा या दोन विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांची सप्टेंबर २०२४ मध्ये बदली झाल्यानंतर तब्बल ११ महिन्यांपासून येथील कारभार प्रभारी होती.मधल्या काळात बीडीओ प्रफुल्ल भोरखडे व त्यानंतर संजय खारकर यांनी या विभागाचा प्रभार सांभाळला. या रिक्त जागी यवतमाळ जिल्ह्यातील बदली होवून आलेले बाळासाहेब रायबोलेयांनी बीडीओचा कारभार सांभाळला.
जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये जबाबदारी सांभाळत त्यांना भारत स्वच्छता मिशनची जबाबदारी मिळाली आहे. जिल्हा परिषदेत सद्या सामान्य प्रशासन आणि मनरेगा या दोन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा लागली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





