अमरावती : महिलेची गळा दाबून हत्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिरजगाव कसबा ते ब्राम्हणवाडा थडी मार्गावरील एका पुलाखाली अंदाजे ३० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह गुरुवारी दुपारी आढळला. या महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर हातपाय बांधून मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पुलाखाली फेकला.

मृत महिलेची गुरुवारी रात्रीपर्यंत ओळख पटली नव्हती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शिरजगावपासून दोन किमी अंतरावर पुलाखाली हा मृतदेह आढळला. मृत महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी व पिवळ्याच रंगाचे ब्लाऊज आहे. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ‘अनिल’ गोंदलेले असून, गळ्याभोवती साडीचा फास आहे. त्याच कापडाने गळा आवळल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. दरम्यान, हा मृतदेह कुजून दुर्गंधी सुटली होती. परिसरातील एका शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी अडीच वाजता नाल्याजवळ जाऊन पाहिले असता त्याला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने शिरजगाव कसबा पोलिसांना माहिती दिली. अमरावतीूहून एलसीबीचे पथकही घटनास्थळी पोहोचले व पुढील तपास सुरु केला. चार दिवसांपूर्वी खून या महिलेचा किमान चार दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कारण महिलेची त्वचा शरीरापासून वेगळी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान ती महिला कोण, तिचा खून कोणी व का केला, अशा अनेक बाबींचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.

यासंदर्भात गुन्हे शाखेचेे पोलिस निरीक्षक किरण वानखेडे म्हणाले की, महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मात्र ती महिला परिसरातील असावी असा अंदाज आहे. तिचा खून कोणी व का केला, याबाबतचा उलगडा ओळख पटल्यानंतर होईल. महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी स्वतंत्र तीन पथके कार्यरत केली आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013515
error: Content is protected !!