अंजनगाव पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला संत गाडगे महाराज नाव द्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
संत गाडगे महाराज यांचे जन्मभूमी असलेला तालुक्यातील पंचायत समिती प्रशासकिय इमारतीला संत गाडगे महाराज प्रशासकीय इमारत पंचायत समिती अंजनगाव सुर्जी असे नाव देण्याबाबत एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. मागणीच्या अनुषंगाने दि. २४ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती प्रांगणामध्ये प्रशासकीय इमारतीला नाव देण्यासंदर्भात आमरण उपोषण करण्यात आले होते. उपोषण मागे घेण्याकरिता लेखी स्वरूपात पत्र व ठराव देण्यात आला. तात्कालीन गटविकास अधिकारी किसन खातळे यांनी दि.२४ फेब्रुवारी रोजी
मासिक सभा बोलून त्या सभेमध्ये उपोषणकर्त्यांची मागणी मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती त्यांना पाठवलेला आहे. जवळपास पाच महिने होऊन गेले. असून अजून पर्यंत प्रशासकीय इमारतीला संत गाडगे महाराज नाव मिळाले नसल्याने आज दि २३ जुलै रोजी पुन्हा गटविकास अधिकारी यांना तेजस अभ्यंकर व सुनील राक्षसकर यांनी निवेदन दिले आहे. अंजनगाव पंचायत समिती नवीन इमारतीला संत गाडगे महाराज नाव दि. १४ ऑगस्ट पर्यंत न दिल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद इमारतीवर चढून “उडी मारू ” आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013514
error: Content is protected !!