-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
अंजनगाव तालुक्यातील नारायणपूर कापूसतळणी येथील विद्यार्थी व पालक आज दि.२४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता पासून पंचायत समिती समोर भरपावसात आमरण उपोषण सुरू केले.
गेल्या तीन महिन्यांपासून नारायणपूर (कापूसतळणी) येथील पालक व विद्यार्थी यांनी पंचायत समिती अंजनगाव गट शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्या वारंवार वर्ग पाचवी ची परवानगी द्या या मागण्यासाठी विनंती अर्ज सादर केले परंतु शाळा सुरू होऊन एक महिना झाला असून सुद्धा अद्याप पाचवी वर्गाची मान्यता दिली नसल्याने शेवटी आज दिनांक २४ जुलै २०२५ ला पंचायत समिती समोर उपोषणाला बसावे लागले.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. परंतु नारायणपूर कापूसतळणी येथील पालक व विद्यार्थी जिल्हा परिषद उर्दु शाळेत पाचव्या वर्गाची मान्यता द्यावी. यासाठी धावपळ करित आहे परंतु सुस्त प्रशासन विभाग या मुलांकडे दुर्लक्ष करत असल्याचे पालक मिर्झा इम्रान बेग, फिरोज खान, महम्मद जमीर, इरफान अली, यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगितले.
यावेळी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदीप येवले,अफसर बेग, कॉग्रेस पक्षांचे अजहर बेग, राजू कुरेशी, माजी सभापती महेश खारोळे, रमेश सावळे,नम्मूभाई,सह अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





