भातकुली : तालुक्यातील गणोजा देवी येथील सरपंच सुचिता जयंत देशमुख, उपसरपंच सोनिया राहुल बोरकर यांच्याविरुद्ध अप्पर आयुक्त यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी २३ जुलै रोजी पदावरून अपात्र ठरत असल्याचे आदेश पारित केले. या प्रकरणात ग्रामपंचायत सदस्य रिजवानखान पठाण यांनी याचिका दाखल केली होती.
पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या दोन पदाधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. त्यांच्या कामात पती हस्तक्षेप करीत असल्याचा आक्षेप रिजवान खान पठाण यांनी नोंदविला होता.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 115





