गुटखा ठेवला होता दडवून : पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास परतवाडा येथील फॉरेस्ट डेपो रोडवरील एका जनरल स्टोअर्समधून प्रतिबंधित गुटखा जप्त केला. २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्या जनरल स्टोअर्सच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथून झडतीदरम्यान बाजीराव, मस्तानी या वेगवेगळ्या ब्रँडचा एकूण ४०,८०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. आरोपीने तो प्रतिबंधित गुटखा अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने जनरल स्टोअर्समध्ये बाळगला होता. स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार स्वप्निल तवर यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी २३ जुलै रोजी उशिरा रात्री दुकानदार दिनेश दुर्गादास नचवानी (३८, रा. गणेशनगर परतवाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





