मोर्शी : तालुक्यातील नेरपिंगळाई मंडळात कमळापूर, शिरलस, राजुरवाडी या गावात २२ जुलैपासून लागोपाठ तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीकाठच्या शेतात पाणीच पाणी झाले.
राजुरवाडी ते तुळजापूर मार्गावर असलेल्या पुलावरून २२ जुलैच्या अतिवृष्टीने धो-धो अतिवृष्टीन पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग २३ जुलैला दिवसभर बंद होता. मोर्शी ते तिवसा मार्गावरील पुलावरून पाणी असल्यामुळे वाहतूक बंद करून एसटीसह इतर वाहनांची वाहतूक लेहगाव, नेरपिंगळाई, तिवसा मार्गाने सुरू करण्यात आली होती. राजूरवाडी येथील नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. गोराळा येथील पिंगळादेवीवरून येणाऱ्या नाल्याला मोठा महापूर येऊन सर्व पाणी राजुरवाडी येथील नदीपात्रात आल्यामुळे मोठा हाहाकार उडाला. त्यातच २३ जुलै रोजी सतत चार तास व २४ जुलै रोजी सतत दोन तास पाणी कोसळल्यामुळे कमळापूर, शिरलस येथील मोठ्या नाल्याला पूर आला. त्यावरील पूल अरुंद असल्यामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिवसा ते रिद्धपूर या रोडचे बांधकाम करण्यात आले असून रोडच्या बाजूला बांधकाम करण्यात आलेल्या नाल्या खोल बांधण्यात न आल्यामुळे शेताचे | बांध फोडून शेतात पाणी घुसले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





