आधी केले अपहरण, मग अडीच लाखांची खंडणी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कमेला ग्राऊंड परिसरातील थरार : धमकावत काढला व्हिडीओ, दोघांविरूद्ध गुन्हा

 

अमरावती : येथील एका पान मटेरियल विक्रेत्याचे अपहरण करून त्याला शस्त्राच्या धाकावर २.५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. २४ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कमेला ग्राऊंड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी मिर्झा शकील बेग मिर्झा अमीर बेग (४४, रा. पठानपुरा) यांच्या तक्रारीवरून गुरुवारी उशिरा रात्री संशयित न्याजुद्दीन बद्रोद्दीन (३८, रा. पठाणचौक) व त्याच्या एका साथीदाराविरुद्ध खंडणीसाठी अपहरण, चुकीच्या पद्धतीने अडवणूक, इच्छापूर्वक दुखापत व अन्य कलमांसह आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

एफआयआरनुसार, मिर्झा शकील बेग हे व्यवसायाने पान मटेरियल विक्रेते आहेत. त्यांनी वर्षभरापूर्वी न्याजुद्दीनकडून सुमारे ९ लाख रुपयांचे पान मटेरियल विकत घेतले होते. त्याचवेळी त्यांनी ३ लाख रुपये चुकतेदेखील केले होते. मात्र, उर्वरित रकमेवरून ऑगस्ट २०२४ मध्ये मिर्झा शकील बेग यांचे अपहरण करण्यात आले होते. मारहाण करून त्यांची दोन तासांनी सुटका केल्यानंतर त्यांनी त्यावेळी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रारदेखील नोंदविली होती. त्यानंतर आपण पुन्हा न्याजुद्दीन याला ३ लाख रुपये दिले. त्यानंतर आपसात तडजोड होऊन तो व्यवहार संपुष्टात आल्याचे मिर्झा शकील बेग यांनी पोलिसांना सांगितले. मात्र त्यानंतरही रकमेसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले.

 

पठाण चौकातून अपहरण २४ जुलै रोजी दुपारी चार वाजता मिर्झा शकील बेग हे पठाण चौकात उभे असताना न्याजुद्दीन हा अन्य एकाला सोबत घेऊन तेथे आला. त्याने मिर्झा यांना दुचाकीवर मधात बसविले. चुपचाप गाडीपें बैठा रह, वरना तेरा यहीपें गेम बजा दूंगा, अशी धमकी दिली. दोन्ही आरोपी त्यांना कमेला ग्राऊंडमध्ये घेऊन गेले. तेथे न्याजुद्दीनने मिर्झा शकील बेग यांना २.५० लाख रुपयांची मागणी केली. त्याने चाकूने धमकावले.

तर जाऊ देणार नाही अडीच लाख देत नाही, तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने आपण घाबरलो. आरोपीने आपल्याला शिवीगाळ करून मारहाणदेखील केली. चाकू मारण्याची धमकी देत अन्य आरोपीने मिर्झा शकील बेग यांचा मोबाइलद्वारे व्हिडीओदेखील काढला. अडीच लाख रुपये तीन दिवसांत दिले नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. दरम्यान, काही वेळाने तेथून लोकांची ये-जा सुरू झाल्यानंतर आरोपींच्या तावडीतून त्यांची सुटका झाली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013513
error: Content is protected !!