मेळघाटातील एकाच परिवाराचे चौघे ठार, ११ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिखलदरा (अमरावती): वैष्णोदेवीचे दर्शन करून परत जालंदर येथे मुलाकडे चारचाकीने येणाऱ्या परिवारावर मागून भरधव वेगाने येणाऱ्या चार चाकीने सोमवारी पहाटे ३:३० वाजता जोरदार धडक दिली. या धडकेत वाहन एका रस्त्याकडेवरील झाडावर आदळल्याने एकाच परिवारातील चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यात ११ महिन्याच्या चिमुकलीसह सेवानिवृत्त वडील व शिक्षक मुलाचा समावेश आहे. तर दोघे जखमी झालेत.

गानू रामलाल बेलसरे (६०), लोकेश गानू बेलसरे (३४), अनिशा लोकेश बेलसरे (२४), निहारिका लोकेश बेलसरे महिने सर्व रा. सोलामुह ता चिखलदरा अशी मृतांची नावे असून, शिवराम कासदेकर ५२, सरस्वती शिवराम कासेकर रा नयाखेडा ता अचलपूर अशी जखमींची नावे आहेत. जालंदर येथे असलेल्या बीएसएफमधील मुलाकडे गेले होते. वैष्णोदेवीवरून येत असताना हा अपघात झाला. संबंधित अपघात करणाऱ्या वाहनाला कुठल्याच क्रमांकाची नंबर प्लेट नसून मृतदेह जालंदर येथील रुग्णालयात नेण्यात आल्या असल्याची माहिती बीएसएफ जवान मंगेश बेलसरे यांनी ‘z24news.dreamhosters.com’शी बोलताना दिली. वृत्तलिहिस्तोवर पोलीस चौकशी करून गुन्हा नोंदवण्याची कारवाई करीत असल्याचे सांगितले

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!