महिलेने दिली टिप; शस्त्रसाठा जप्त, साठेबाज मात्र रफूचक्कर!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पिस्टल, तलवारी आढळल्या :

नांदगाव पेठ पोलिसांकडून शोधमोहीम

 

अमरावती : एका महिलेने दिलेल्या टिपनुसार नांदगाव पेठ पोलिसांनी २३ जुलै रोजी आशिषनगर भागातील एका घरातून पिस्टल, तलवारी असा घातक शस्त्रसाठा जप्त केला. मात्र, ज्याच्या घरातून तो शस्त्रसाठा जप्त करण्यात आला, तो मात्र ४८ तासांनंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याने तो इतका मोठा शस्त्रसाठा नेमका कशासाठी घरात दडवून ठेवला होता, त्याची उकल झालेली नाही. ती उकल  करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची शोधमोहीम हाती घेतली आहे. दिपेश दीपक काकडे असे फरार साठेबाजाचे नाव आहे.

ठाणेदार दिनेश दहातोंडे हे बुधवारी आपल्या कक्षात असताना एक महिला त्यांच्याकडे आली. दिपेश काकडे हा आपल्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत होता. त्याने घरात तलवारी व बंदूकदेखील दडवून ठेवल्याची माहिती तिने दिली. त्या आधारे दहातोंडे हे २३ ला सायंकाळी ५ च्या सुमारास दिपेशच्या राहत्या घरी आशिषनगर येथे पोहोचले. त्यावेळी दिपेश हा घरी आढळला नाही. घरझडतीत पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये लाकडी दिवाणचे कपड्यांखाली दडवून ठेवलेल्या पाच लोखंडी तलवारी दिसून आल्या. एका लाकडी आलमारीत अगदी समोरच २५ हजारांची पिस्टल दिसून आली होती.

तेथे २५ हजारांची पिस्टल, दोन चायना चाकू, कोयता, कुकरी, गुप्तीसोबत बकेटमध्ये दोन फरशे आढळले.

 

आरोपीच्या घरातून पिस्टलसह अन्य घातक शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. तो हाती आल्यानंतरच त्याने तो साठा नेमका कशासाठी करून ठेवला, त्याचा उलगडा होऊ शकेल.

दिनेश दहातोंडे, ठाणेदार, नांदगाव पेठ

शस्त्रसाठा कशासाठी ?

दीपेश २३ जुलैपासून फरार आहे. त्याने ती शस्त्रे कुठून आणली, ती घरात का दडवली, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्या शस्त्रांचा वापर तो कुठे करणार होता, अशा विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी त्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013513
error: Content is protected !!