अनुकंपा’; कुटुंबातील दुसऱ्याला मिळणार संधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शासनाने केला धोरणात बदल : अनुकंपाधारकांना मिळाला दिलासा

 

अमरावती : अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरीसाठी अर्ज केलेल्या, पण नोकरी मिळेपर्यंत वयोमर्यादा संपणाऱ्यांना आता आपल्या जागी दुसऱ्याचे मानांकन करता येणार आहे. राज्य शासनाने अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीत सुधारणा केली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला आहे. यानुसार अनुकंपा नियुक्ती धोरणा अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यामुळे अनुकंपाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय सेवेत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत थेट सरळसेवेत भरती करून घेतले जाते.

 

संवर्गही बदलता येणार

वयोमर्यादसोबतच संवर्गही बदलता येणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार गट ‘क’ किंवा गट ‘ड’ या संवर्गात प्रारंभी नोंदणी होते. मात्र, प्रत्यक्ष नोकरी मिळेपर्यंत शैक्षणिक पात्रतेत वाढ झाली तर संबंधितांना आता संवर्ग बदलता येणार आहे. गट ‘ड’मधून गट ‘क’ संवर्गात समाविष्ट होता येणार आहे. तसेच गट ‘क’मधील संवर्गातून गट ‘ड’ मध्येही जाता येणार आहे. मात्र, हा बदल केवळ एकदाच करता येणार आहे.

ग्रामविकास विभागानेही काढावा निर्णय

राज्याच्या जिएडीने अनुकंपा नोकरी भरतीच्या धोरणात बदल केला. मात्र, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेला हा निर्णय लागू नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाने झेडपीसाठी स्वतंत्र निर्णय काढावा, अशी मागणी झेडपी कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष पंकज गुल्हाने व पदाधिकारी यांनी केली.

 

अर्ज केला आणि वयाची ४५ वर्षे पुर्ण होईपर्यंत नोकरी मिळाली नाही, तर नोकरीवरील हक्क संपुष्टात येत होता.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013513
error: Content is protected !!