मोर्शी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य, आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना सोबतच अकोला स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना आणि लीलाशंकर फाउंडेशन वाई (खुर्द) अंतर्गत २२ महिला रुग्णांवर गर्भपिशवी शस्त्रक्रिया पार पडल्या.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार, स्त्री व प्रसूती शल्यचिकित्सक डॉ. श्यामकुमार सिरसाम, डॉ. अंकुश अजमेरा, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. पवन बोंडे, डॉ. ऋतुजा श्रीराव, डॉ. राहुल साहवे, डॉ. रावसाहेब खुपसे, डॉ. पूजा होपमाने, डॉ. गुरप्रीत कौर, भूलतज्ज्ञ डॉ. जगदीश काळभोर, डॉ. अश्विनी वंजारी उपस्थित होते. हे शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. संदीप हेडावू, डॉ. दर्शन चांडक, डॉ. अंकिता मटाले, डॉ. अविनाश मरकड, गजानन पांडे, डॉ. कांचन भिसे, डॉ. आवारे यांच्या मार्गदर्शनात पार पडले. शिबिराकरिता उपजिल्हा रुग्णालयाचे वरूड व मोर्शी वैद्यकीय समन्वयक डॉ. घनश्याम मानकर, सुमन जावरकर, वर्षा दारोकर, मीनाक्षी वगारे, भाग्यश्री नागले, रेश्मा बहुरूपी, संदीप पवार, अंकित नेवारे, सागर झटाले, आंचल तायवाडे, निकिता खडसे, प्रवीण कापडे, ज्ञानेश्वर टाकले, प्रतीक्षा पांचाळे, शोभा इंगोले, शीला राऊत, नौशाद खान, आकाश जवंजाळकर, महात्मा जोतिराव फुले जन व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेतील वसीम शेख, सुजाता पांडे, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





