मेघे कॉलेजला एमबीए अभ्यासक्रमास मंजूरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बडनेरा : विदर्भ युथ वेलफेअर अॅण्ड एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट या महाविद्यालयास एमबीए अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासन व ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडून अधिकृत मान्यता प्राप्त झाली. २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना या नव्याने सुरू होणाऱ्या दोन वर्षीय एमबीए अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम व्यवस्थापन कौशल्यांचा विकास व उद्योगजगतात करिअर घडविण्यासाठी उत्तम आधार ठरणार आहे. या यशामागे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंह चौधरी, सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनम चौधरी, पंकज देशमुख, विनय गोहाड, गजानन काळे, प्राचार्य डॉ. अजय ठाकरे यांचे योगदान लाभले. हा अभ्यासक्रम प्रकल्पाधारित शिक्षण, इंडस्ट्री इंटरॅक्शन, लाईव्ह केस स्टडीज, मार्केट रिसर्च, आणि प्लेसमेंट सेल मार्फत उद्योगांशी थेट जोडणारा असेल. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर जॉब रेडी स्किल्स मिळणार आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात एमबीए ही एक अत्यावश्यक शैक्षणिक पायरी ठरत असून विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी आता अमरावतीतच ती संधी उपलब्ध होणार आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013512
error: Content is protected !!