रुग्ण कल्याण समितीचे कामकाज नावापुरतेच !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णकल्याण समितीचे संबंधित जिल्हा परिषद गटाचे सदस्य हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. परंतु, मागील तीन वर्षापासून या सदस्यांना कार्यकाळ संपल्यामुळे झेडपीवर प्रशासक राजवट आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णकल्याण समितीच्या बैठका कोण घेत असेल. या बैठका घेतल्या तर काय निर्णय घेतले जातात. याची माहिती केवळ संबंधित विभागापुरतीच मर्यादित राहत असून, रुग्णकल्याण समितीच्या कामकाजाचा ठावठिकाणाच लागत नाही. परिणामी संबंधित रुग्ण कल्याण समितीने आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णासाठी काय उपाययोजना केल्या, ही बाबच कळत नाही. सध्या या समितीचा संपूर्ण कारभार हा टीएमओ व संबंधित एमओ यांच्याव्दारा चालविला जात आहे.

 

समितीचे कामकाज काय ?

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निधीतून गुणवत्तापूर्वक सुविधा आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणे, नियमितपणे समितीच्या बैठका घेऊन रुग्णालयातील अडचणींवर चर्चा, औषध खरेदी, सेवांकडे लक्ष, निधीचे नियोजन करून रुग्णांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविणे आदी.

 

रुग्णकल्याण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे संबंधित जिल्हा परिषद गटाचे सदस्य असतात. मात्र, प्रशासक असल्याने ही जबाबदारी संबंधित टीएमओ व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सोपवली आहे. संबंधितांना रुग्णकल्याण समितीची बैठक नियमित घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

डॉ. सुरेश आसोले, डीएचओ

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013512
error: Content is protected !!